Header Ads Widget

विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना नाव पडताळणीचे आवाहन

विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना नाव पडताळणीचे आवाहन

नाशिक  : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून डिसेंबर २०२१, मे २०२२ आणि जुन २०२२ ह्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी मराठी (देवनागरी) नाव पडताळणी व दुरुस्तीकरिता विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विशेष सोय करण्यात आलेली आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी काही विद्यार्थ्यांकडून मराठी (देवनागरी) नावाची नोंद करताना चुका होतात त्यामुळे मराठी (देवनागरी) नाव दुरुस्तीचे हे अभियान विद्यापीठामार्फत राबविण्यात  येत आहे. उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना दीक्षांत सोहळ्यात देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी आपले मराठी (देवनागरी) नाव पडताळणी आणि दुरुस्तीची सोय विद्यापीठाच्या https://28convocation.ycmou.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठीची  मुदत  २९ जानेवारी २०२३ पर्यंत आहे. आपापले मराठी (देवनागरी) नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असेल तर संकेतस्थळावरच विद्यार्थ्यांना त्वरित करता येऊ शकेल. विद्यार्थ्यांनी आपले नाव दुरुस्ती न केल्यास भविष्यात प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्तीसाठी विद्यापीठामार्फत शुल्क आकारण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापली नावे तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी  असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील ह्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1