Header Ads Widget

Child Care leave : खूशखबर… आता सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांना देखील मिळणार बाल संगोपन रजा , कोण घेऊ शकतो रजा ??

 Child Care leave : खूशखबर… आता सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांना देखील मिळणार बाल संगोपन रजा


Child Care leave : विकलांग व्यक्तींसाठी (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम, १९९५ हा अधिनियम अधिक्रमित करुन, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ हा नवीन अधिनियम अस्तित्त्वात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर विकलांग अपत्याच्या वयोमर्यादेची अट शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

Balsangopan Raja New GR
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम,२०१६ मधील कलम २(ZC) अंतर्गत, परिशिष्टात नमूद केल्यानुसार दिव्यांगत्वामध्ये खालील प्रवर्गांचा समावेश केला आहे.
खालील प्रवर्गातील दिव्यांग अपत्य असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास तसेच अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास देखील दिनांक २१ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार विहित केलेली बाल संगोपन रजा अनुज्ञेय राहणार आहे.
 मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत सदर रजा लागू राहील. बालसंगोपन रजेवर असताना मुलाच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यास, त्या दिनांकापासून पुढे बालसंगोपन रजा लागू होणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची राहील.एका वर्षामध्ये दोन महिन्यांच्या कमाल मर्यादेत सदर रजा घेता येईल.
Child Care leave Rule 2023
दिव्यांगत्व हे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील दिव्यांगत्वाच्या व्याख्येप्रमाणे असणे अनिवार्य राहील.सदर “Child Care Rule 2023” अनुज्ञेयतेच्या अटी दिनांक २१ सप्टेंबर २०१६ शासन निर्णयानुसार अर्जित रजा व अर्धवेतनी रजा खात्यावर असली तरी सदर रजा मंजूर करता येईल.

अर्जित रजा,अर्धवेतनी रजा, प्रसूती रजेला जोडून बालसंगोपन रजा घेता येईल.बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्यापूर्वी जितके वेतन मिळत असेल तर तेवढेच रजा वेतन देण्यात येते.


बालसंगोपन रजा शासन निर्णय येथे डाऊनलोड करा


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1