Header Ads Widget

Employees transfer : मोठी बातमी.. ‘या’ दोन जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार स्व जिल्ह्यात समायोजन! शासन निर्णय दि 16/5/2023

 Employees transfer : मोठी बातमी.. ‘या’ दोन जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार स्व जिल्ह्यात समायोजन! शासन निर्णय दि 16/5/2023

 Employees transfer : दिनांक ०१ ऑगस्ट, २०१४ पासून ठाणे जिल्ह्याचे विभाजन सुरू असून ठाणे जिल्हा व नवनिर्मित पालघर जिल्हा असे दोन जिल्हे अस्तित्वात आले आहेत.ठाणे जिल्हा परिषद व पालघर जिल्हा परिषद अशा दोन स्वंतंत्र जिल्हा परिषदा कार्यान्वित झालेल्या आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन
मुळ ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद,ठाणे या आस्थापनेवरील बरेचसे कर्मचारी पालघर जिल्ह्यात कार्यरत असल्याने ठाणे / पालघर जिल्ह्यातील कर्मचान्यांचे समायोजन कसे करावे, याबाबत ग्रामविकास विभागाकडील वाचा येथील दि. २९.०२.२०१६ व दि. २२.०७.२०१६ च्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या होत्या.

 मा. उच्च न्यायालयाच्या वाचा येथील दि.२३.०६.२०१७ च्या आदेशानुसार शासनाने वाचा येथील दि.३१.०७.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारीत निर्णय घेतला आहे.तथापि, जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे विचारात घेऊन, पालघर जिल्हा परिषदेमध्ये विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवा ठाणे जिल्हा परिषदेकडे अद्याप वर्ग करण्यात आलेल्या नाहीत.

Teachers online transfer
 ठाणे/पालघर जिल्हा परिषदेमध्ये विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या ठाणे/पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा मूळ ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यासंदर्भात शासनास यथोचित उपाययोजना सुचविण्यासाठी वाचा येथील दि. १६.०१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.

 सदर अभ्यासगटाने सांगोपांग विचार विनिमय करून पालघर जिल्हा परिषदेकडे विकल्पाच्या विपरीत समायोजन झालेल्या २१८ शिक्षकांच्या सेवा ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत दि.२९.०३.२०२३ रोजी अहवाल सादर केला आहे.पालघर जिल्ह्यामध्ये पवित्र प्रणालीमार्फत १६६ शिक्षकांची भरती झाल्याचे तसेच ५२ गज-ड प्रवर्गातील विकल्प विपरित कार्यरत असणारे शिक्षक पालघर जिल्हा परिषदकडून ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे आवश्यक असताना त्यांना पालघर जिल्हा परिषदेकडून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही, असे सदर अहवालान्वये कळविण्यात आले आहे.
 सध्या ५८ शिक्षकांनी पालघर जिल्ह्यात कार्यरत राहण्यासाठी ठाणे जिल्हा विकल्पास नकार दिलेला आहे.असेही नमूद करण्यात आले आहे. सदर अहवालाच्या अनुषंगाने पालघर जिल्हा परिषदेमध्ये विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या ठाणे / पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा मूळ ठाणे / पालघर जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.


DOWNLOAD GR

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1