Header Ads Widget

ब्रेकिंग न्यूज .. 7 व्या वेतन आयोगाचा 3 रा हप्ता जमा होणार

                                 ब्रेकिंग न्यूज .. 7 व्या वेतन आयोगाचा 3 रा हप्ता जमा होणार 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांना ७ वा वेतन

आयोगाच्या ३ रा हप्त्याची रक्‍कम वितरीत

करणेबाबत.



नगरपरिषद प्रशासन संचालनालय

नवी मुंबई महानगरपालिका जुनी इमारत, बेलापूर भवन, ७ वा मजला,

बेलापूर सेक्टर-११, सौ. बी. डौ. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४


आदेश क्र.नपप्रसं/२०२३-२४/नपा सहा अनुदान/का-५/ 2793


दिनांक: 19 May 2023


आदेश

संदर्भ - शासन निर्णय क्र. वेषुर-२०१९प्र क्र.८/सेवा-९, दि. ०९.०५.२०२२


राज्यातील नगरपरिषदांचा जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्याऐवजी सदर नगरपरिषदांना सहायक अनुदान

वितरित करण्यात येते. सदर प्रयोजनार्थ सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्र.एफ-२, २२१७, नगर विकास, १९२,

नगरपरिषदांना सहाय्य, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, (००) (Ro) जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे नगरपरिषदांना दयावयाचे सहाय्यक अनुदान, ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२१७८०६६) या लेखाशिर्षाखाली रक्‍कम रु. २६९५, ४४,००,०००/-

(रु. दोन हजार सहाशे पंच्याण्णव कोटी चवेचाळीस लाख) अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.


शासन अधिसूचना वित्त विभाग, दि. ३०.०१.२०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील

५ वर्षात, ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना

रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपध्दती शासन परिपत्रक वित्त विभाग, दि. २०.०२.२०१९ अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजन अथवा परिभाषित अशंदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्याथकबाकी रक्‍कम ५ वर्षात, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक दि. ३०.०५.२०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. उपरोक्त संदर्भाधीन आदेशान्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मवाऱ्यांना दिनांक ०१.०७.२०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत मान्यता दिलेलौ आहे.

सबब त्यानूसार या आदेशान्वये परिशिष्ट अ मध्ये नमूद स्थानिक स्वराज्य संस्था यांना ७ व्या वेतन आयोगाच्या ३ रा

हप्ताकरीता रक्‍कम रु. १५३,५२,६९,७१८/- (रु. एकशे त्रेपन्न कोटी बावण्ण लाख एकोणसत्तर हजार सातशे अठरा) वितरीत करण्यात येत आहे.


(डॉ. किरण कुलकर्णी)

आयुक्त तथा संचालक

नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई,

प्रती :-


१२. मा.प्रधान सचिव (नवि-२),नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.


१३. जिल्हाधिकारी (विवरणपत्रात नमूद केलेले)


१४. मुख्याधिकारी नगरपरिषद (विवरणपत्रात नमूद केलेले)


१५. अधिदान व लेखाधिकारी, वांद्रे, मुंबई


१६. निवासी लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे मुंबई


१७. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन (सर्व)


१८. महालेखाकार, मुंबई / नागपूर


१९. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई


२०. उपमुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर


२१. कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, नवि-४,१४ मंत्रालय, मुंबई ३२


२२. निवडक फाईल.


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1