प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध होईल. राज्यातील १७ शहरांत सात एप्रिलला परीक्षा होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यासाठी सेट परीक्षा घेण्यात येते. आचारसंहितेमुळे परीक्षेबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या; पण आता अधिकृतपणे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्याने सेटबाबत संभ्रम दूर झाला आहे. टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये त्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
परीक्षेच्या सात दिवस आधीच विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र आणि इतर तपशील उपलब्ध होईल. रविवारी (ता. ७) सकाळी दहा ते दुपारी दीडदरम्यान परीक्षा होईल. जवळपास सर्वच विद्याशाखांतील पदव्युत्तर पदवी प्राप्त सर्वच विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतात. मार्च २०२३ मध्ये झालेल्या सेटप्रमाणेच यंदाच्या ३९व्या सेटची रचना असेल.
प्रवेशपत्रासाठी : खालील लिंकवर टिचकी मारा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS