आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजीत भाषा म्हणून दर्जा मिळाला. आपण टीव्हीवर या विषयाबाबतीत बातम्या ऐकल्याच असतील. अभिजात भाषा म्हणजे नेमके असते तरी काय? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय उपयोग होणार आहे? मराठी काय करू शकतो?
आपण आज याविषयी जाणून घेणार आहोत
भारतात अभिजात भाषा किती आहेत ?
भारतात एकूण 11 अभिजात भाषा आहेत.
तमिळ
संस्कृत
मल्याळम
कन्नड
तेलुगू
ओडिया
पाली
मराठी
प्राकृत
असामी
बंगाली
👉 सर्वात प्रथम तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे
👉 अभिजात दर्जा मिळाली दुसरी भाषा म्हणजे संस्कृत
👉 बुद्धकालीन साहित्य ज्या भाषेमध्ये आहे ही भाषा म्हणजे पाली भाषा. पाली भाषा देखील अभिजात भाषा आहे
👉 प्राकृतिक भाषा नसून तो भाषांचा समूह आहे. संस्कृतचे सोपे रूप म्हणजे प्राकृत भाषा होय
🤔 भाषेला अभिजात दर्जा केव्हा मिळतो ?
👉 भाषा 1500 ते 2000 वर्षे जुनी असावी
👉 त्या भाषेत गद्यपद्याचे मुबलक साहित्य असावे त्या भाषेतील साहित्य परंपरा स्वतंत्र व समृद्ध असावी. इतर भाषेतून अनुवादित केलेले साहित्य नसावे
👉 लोक रोज त्या भाषेत बोलत नसतील तरी चालेल. मात्र त्या भाषेचा बोलीभाषा प्रभाव असावा.
👉 पूर्वी वापरात असलेले त्या भाषेवर रूप आणि आता वापरत असली भाषा यात स्पष्ट फरक दिसावा.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS