Postal Ballot General Vidhansabha Election 2024 Update - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पोस्टल बॅलेट संदर्भाने महत्त्वाची सूचना
Postal Ballot General Vidhansabha Election 2024 Update - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पोस्टल बॅलेट संदर्भाने महत्त्वाची सूचना
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पोस्टल बॅलेट संदर्भाने सूचना
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तारीख
20 नोव्हेंबर ला
एकाच टप्प्यात मतदान मुळे जवळपास सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पोस्टल बेलेट पेपर वर च वोटिंग होईल..
सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम आपले व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मतदान होईल याची काळजी व तजवीज आजच करून ठेवा...
त्यासाठी..👇🏻
2.निवडणूकीच्या पहिल्या ट्रेनिंग ला जातांना पोस्टल बेलेट मागणीसाठी फॉर्म नं 12 भरून सोबत न्या.. त्यासोबत आपली निवडणूक ऑर्डर व मतदार ओळखपत्र xerox प्रत जोडा..
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना पोस्टल बेलेट मिळेल तथापि काही 2 ते 3% जे कर्मचारी स्थानिक लेवल ला साहित्य जमा करायला असतील व ज्यांचे मतदान त्याच तालुक्यात असतील किंवा काही महिला कर्मचारी ज्यांची इलेक्शन नेमणूक स्वतः च्या शाळेच्या/ कार्यालय कार्यक्षेत्रांतील मतदारसंघात असेल अश्याच महिला कर्मचाऱ्यांना पोस्टल ऐवजी EDC मिळू शकते त्यासाठी त्यांना फॉर्म 12A भरावा लागेल व त्यांचे मतदान EVM वर संबंधित इलेक्शन ड्युटी सेंटर वर होईल..
( मात्र 95 % कर्मचारी नेहमीप्रमाणे बाहेरील तालुक्यात इलेक्शन ड्युटी ला जातात त्यामुळे अश्या कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर 12 भरून पोस्टल बेलेट पेपर ची मागणी करावी लागते, ती त्यांनी करावी. )
जे पोस्टल बेलेट पेपर साठी फॉर्म भरतील त्यांना दुसऱ्या ट्रेनिंग पर्यंत किंवा शेवटच्या ट्रेनिंग पर्यंत ( मतदान च्या एक दिवस आधी) बेलेट पेपर मिळतील, आणि मिळालेले पोस्टल बेलेट पेपर संबंधित दुसऱ्या / अंतिम ट्रेनिंग सेन्टर वरच निवडणूक तारखे च्या एक दिवस आधीपर्यंत जमा होतील..
3. सोबतच आपल्या घरात 85 + वयाचे वयोवृद्ध किंवा दिव्यांग मतदार असतील तर यांना मागणीनुसार पोस्टल बेलेट वर होणार आहे, त्यामुळे सर्वांनी आपापल्या घरातील, कुटूंबातील 85 + वय असलेल्या वयोवृद्ध व दिव्यांग फॅमिली मेम्बर साठी फॉर्म नं 12 D भरून BLO कडे ते देऊन त्यांच्यासाठी पोस्टल बेलेट ची मागणी करा, ते चालू फिरू शकत नाही हे BLO ला / पडताळणी साठी आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना समजावून सांगा जेणेकरून ते पोस्टल बेलेट ची मागणी नाकारणार नाहीत..
85 + व दिव्यांग मतदार जोडले तर आपला vote (for ops) चा पोस्टल बेलेट चा आकडा / टक्केवारी वाढणार आहे ..
सदर पोस्ट सोबत फॉर्म नं.12 , 12 A आणि 12 D पाठवत आहोत..
कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट अर्ज पीडीएफ डाउनलोड
इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट EDC साठी अर्ज
Download
85 + व दिव्यांग मतदार साठी पोस्टल बॅलेट अर्ज.
Download
चला लोकशाही बळकट करूया, 100% मतदान करूया.. आपल्या मुद्द्यावर मतदान करूया...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक नेमणूक आदेश प्राप्त झाले/होणार आहेत. ज्यांची निवडणूक ड्युटी लागली असेल त्यांनी पोस्टल बॅलेट साठी पुढील सूचनेनुसार कार्यवाही करावी.
1) यावर्षी पोस्टल बॅलेट पोस्टाने पाठवणे बंद झाल्यामुळे व वैयक्तिक वितरित केले जाणार नाहीत.
2) त्यामुळे आपल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे पहिल्या प्रशिक्षणास येतेवेळी आपण आपल्या आदेशाची एक झेरॉक्स प्रत व आपल्या अद्यावत EPIC क्रमांक असलेले मतदान ओळखपत्र व आपले मतदार यादीतील सध्याचा यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक यासह उपस्थित रहावे.
3) पहिले प्रशिक्षणाचे दिवशी नमुना क्रमांक 12 मिळणार असून तो लगेच अचूक भरून तेथेच आपल्या आदेशाची व ओळखपत्राची झेरॉक्स प्रत जोडून त्याच दिवशी सादर करायची आहे. कारण दुसऱ्या प्रशिक्षणासाठी आपण वेगळ्या LAC मध्ये जावे लागणार असल्याने आपणास पीबी पासून वंचित रहावे लागेल याची नोंद घ्यावी.
माहितीस्तव
मतदान यादीतील आपला क्रमांक शोधण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.
https://voters.eci.gov.in/signup
https://voters.eci.gov.in/signup
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS