Header Ads Widget

अशी करा तम्बाखुमुक्त शाळा TOBACCO FREE SCHOOL CRITERIA - तम्बाखुमुक्त शाळा निकष , आवश्यक पुरावे व फोटो

 TOBACCO FREE SCHOOL CRITERIA -  तम्बाखुमुक्त शाळा निकष , आवश्यक पुरावे व फोटो  - 


निकष - १  शैक्षणिक संस्थेच्या आवारात ६० सें. मी. x ४५  सें. मी. आकाराचा “तंबाखमूक्त परीसर” चा फलक असावा.या फलकावर अधिकृत व्यक्तीचे  नाव व / हुद्दा / संपर्क  क्रमांकाचा उल्लेख (  साईन बोर्डवर ) असावा. 






निकष - २ : "तंबाखमूक्त शैक्षणिक संस्था "प्रवेशद्वाराच्या सीमेवर/ शैक्षणिक संस्थेच्या बाह्यभिंतीवर वर ६० सें. मी. x ४५  सें. आकाराचा फलकलावलेला असावा.या फलकावर अधिकृत व्यक्तीचे  नाव व / हुद्दा / संपर्क  क्रमांकाचा उल्लेख (  साईन बोर्डवर ) असावा. 




निकष - ३ शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थ वापराचा 

पुरावा असू नये .उदा. सिगारेट / बिडीचे तुकडे किंवा गुटखा / तंबाखूचे पाऊच / भिंतीवर थुंकल्याचे डाग इत्यादी 

पुरावा : आपल्या शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसराचा फोटो व मुख्याध्यापकांच्या सहीचे घोषणापत्र.








निकष - ४ तंबाखूचे दुष्परिणाम यावर आधारित पोस्टर किंवा तंबाखूचे दुष्परिणाम वर आधारित साहित्य शाळेत प्रदर्शित केलेले असावे

पुरावा - विद्यार्थ्यांकडून तंबाखूचे दुष्परिणाम वर आधारित पोस्टर निकषांची माहिती असणारे पोस्टर तयार करून शाळेत चिटकवणे व या सोबत शिक्षक विद्यार्थी यांचा फोटो घेणे





निकष - ५ शैक्षिक संस्थेत गेल्या सहा महिन्यात किमान एक तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवणे

पुरावा
तंबाखू मुक्त शाळा रांगोळी स्पर्धा तंबाखूविरोधी प्रभात फेरी मूक तपासणी करत असताना सत्कार समारंभ करीत असताना कायद्याची माहिती देताना जागतिक कर्करोग दिन साजरा करताना एक दिवस मी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करताना, नववर्ष संकल्प दिवस, जागतिक मानवाधिकार , शेहत की राखी, बालदिन, सण-उत्सव , तंबाखूमुक्त शपथ इत्यादी पैकी कोणत्याही एका उपक्रमाचा फोटो , ज्यामध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम / तंबाखूविरोधी  कार्यक्रम असा उल्लेख आहे.


निकष - ६ शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखू मॉनिटर म्हणून कर्मचारी मधून अधिकारी किंवा शिक्षक किंवा विद्यार्थी प्रतिनिधी मधील नेमणुका नेमले पाहिजेत फलकावर तंबाखू मॉनिटर नावे पद होता आणि संपर्क नंबर नमूद केले जावेत




निकष - ७ तंबाखूचा वापर शाळेच्या परिसरात केला जाणार नाही हा नियम सृष्टी संस्थेच्या आशा संहितेमध्ये कोड ऑफ कंडक्ट समाविष्ट केला गेला पाहिजे

पुरावा शालेय परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे सेवन करणे विक्री करणे आणि जाहिरात करणे यावर बंदी असून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर मॉनिटर मुख्याध्यापक किंवा प्रभारी अधिकारी या कडून कारवाई करण्यात येईल




निकष - ८ शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून 100 यार्ड क्षेत्र रेखांकित केले गेले असावे

पुरावा शाळेचा शंभर पर्यंत परिसर दिसेल असा पिवळ्या रंगाने रेखांकित करून तेथे तंबाखू मुक्त क्षेत्र असे नाव लिहून त्याचा फोटो घ्यावा
त्यात शाळेचे नाव किंवा मुले शिक्षक मुख्याध्यापक पालक सोबत फोटो घ्यावा


 

निकष - ९ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी कोणत्याही दुकान शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात नसावे

पुरावा सदर पत्र तोबॅक्को फ्री स्कूल अॅप वर अपलोड करताना त्यावरत्यावर मुख्याध्यापक प्रभारी अधिकारी यांचे नाव सही आणि शिक्का असणे अनिवार्य आहे जर एखादे दुकान असेल तर स्थानिक अधिकारी सरपंच तहसीलदार यांचे आरोग्य अधिकारी पोलीस यांना पत्र कळवावे
अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती भरावी व शेवटी प्रमाणपत्र दिले जाईल .


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1