विषय:- गणित
इ:- 7वी
घटक 3:- मसावि-लसावि
संख्येचे मूळ अवयव पाडणे
“कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते.”
उदा. 45 = 5 × 3 × 3
✳️ संख्यांचा लसावि व मसावि काढण्यासाठी युक्लिडचा हा सोपा व महत्त्वाचा नियम अनेकदा वापरला जातो.
👉🏼 दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात
लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय.
👉🏼संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे ते पाहू.
उदा. 24 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा.
👉🏼मूळ अवयव काढण्याची पद्धत
(आडवी मांडणी)
24 = 2 × 12
= 2 × 2 × 6 ...(12 चे अवयव पाडले आहेत.)
= 2 × 2 × 2 × 3 ...(6 चे अवयव पाडले आहेत.)
2 व 3 हे मूळ अवयव आहेत.
24 = 2 × 2 × 2 × 3
उदा 1). 117 चे मूळ अवयव पाडा.
117= 13 × 9
= 13 × (3 × 3)
117 = 3 × 3 × 13
उदा 2). 250 चे मूळ अवयव पाडा.
250= 2 × 125
= 2 × (5 × 25)
= 2 × 5 × (5 × 5)
250 = 2 × 5 × 5 × 5
उदा 3). 40 चे मूळ अवयव पाडा.
40 = 10 × 4
= (5 × 2) × (2 × 2)
40 = 2 × 2 × 2 × 5
‼️स्वाध्याय‼️
खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा.
(i) 32 (ii) 57 (iii) 23 (iv) 150 (v) 216 (vi) 208
(vii) 765 (viii) 342 (ix) 377
(x) 559
*Education World*
👉🏻 *FOR TEACHERS*
👉🏻 *FOR STUDENTS*
सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील शिक्षक बंधू भगिनी साठी अत्यंत महत्त्वाचे* गरजाधिष्टीत प्रशिक्षण निर्मिती लिंक माहिती व उत्तरे http://edutechmarathi.blogspot.com/2022/02/creation-of-need-based-teacher-training.html*
👇 प्रश्नावली उत्तरा सहित*
https://estudi.in/educational-news/creation-of-need-based-teacher-training/
📗📗📗📗📗
🌀 शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अँप DOWNLOAD APP NOW 👇 https://bit.ly/3kSua93
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👉🏻 LIKE
👉🏻 Share
👉🏻 Subscribe
👉🏻 Follow
हे पाहिले❓❓ 👇
👉🏻 एक्सेल 35 व्हिडिओ* https://bit.ly/3jTR2n8
👉🏻 एम एस वर्ड व्हिडिओ
🎯🎯🎯🎯🎯🎯
या वेबसाईटला भेट द्या
❇️❇️❇️❇️❇️❇️
विविध माहितीपुर्ण व्हिडिओ साठी खलील लिंक वरून चॅनेल *SUBSCRIBE* करा https://bit.ly/3nAXgJM
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
लक्ष्मण ननवरे
प्राथमिक शिक्षक
तलासरी , पालघर
संपर्क 8446699081
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS